Ad will apear here
Next
‘वर्डस् काउंट’ या दुसऱ्या शब्दोत्सवाचे पुण्यात आयोजन
पुणे : येथील साहित्य आणि कला क्षेत्रातील जाणकार वर्षा चोरडिया आणि सबिना संघवी यांच्या पुढाकाराने तीन फेब्रुवारी २०१९ रोजी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू मॅरिएट येथे ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या शब्दोत्सवाची संकल्पना ही सुप्रसिद्ध पुरस्कार्थी लेखिका, पटकथाकार आणि स्तंभलेखिका अद्वैता कला यांची असून, शब्दोत्सवाचे ही दुसरी आवृती आहे. हा महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत रंगेल.          

या शब्दोत्सवाला पंचशील रिअल्टी आणि जे. डब्लू मॅरिएट यांचे विशेष सहकार्य लाभले असून, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या वेळी राजकारण, चित्रपटसृष्टी, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होणार असून, यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश, खासदार वरुण गांधी, खासदार असदुद्दिन ओवेसी, जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव पवन वर्मा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय आयोजक सचिव सुनील आंबेकर, गीतकार, कवी आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांचा समावेश आहे. हे सर्व मान्यवर विविध विषयांवर आपली मते उपस्थितांसमोर मांडणार आहेत.

याबरोबरच ‘इंडिक रायटर्स’ या विषयावर एका विशेष सत्राचे आयोजन या शब्दोत्सवात करण्यात आले असून, यामध्ये साईस्वरूपा अय्यर, शैफाली वैद्य, मयुरेश दिडोलकर, डिंपल कौल, कविता काणे आपले विचार मांडतील. केवळ वादविवाद न घालता खऱ्या अर्थाने संवाद होणे, चर्चा करण्याबरोबरच नागरिकांना आपली मते व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे ‘वर्डस् काउंट’ या शब्द महोत्सवाचे उद्दिष्ट्य आहे.

‘कला, राजकारण, संस्कृती आणि साहित्य या आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात शब्दांची भूमिका आणि वापर हा महत्त्वपूर्ण आहे. हा वापर करीत असताना शब्दांचे महत्त्व आणि भूमिका अधिक स्पष्ट होण्याच्या उद्देशाने ‘वर्डस् काउंट’ कार्यरत आहे. नोव्हेंबर २०१७ साली ‘वर्डस् काउंट’ची पहिली आवृत्ती दिल्ली येथे पार पडली होती. त्यानंतर आता पुणे शहरात ही दुसरी आवृती होत आहे, याचा मला आनंद आणि अभिमान आहे,’ असे मत या वेळी शब्दोत्सवच्या क्युरेटर अद्वैता कला यांनी व्यक्त केले. या शब्दोत्सवात विविध विषय, संकल्पना यांवर दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा होईल असा माझा विश्वास असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.       

या वर्षीच्या शब्दोत्सवात पवन वर्मा यांना ‘दी वर्डस्मिथ’ या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. वरुण यांना त्यांच्या भाषण कौशल्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. प्रसिद्ध डिझायनर शंतनू आणि निखील या जोडीने हा पुरस्कार डिझाइन केला आहे.

पूर्वनोंदणीसाठी : rsvp@panchshil.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZEYBW
Similar Posts
‘माझ्यासाठी देश महत्त्वाचा’ पुणे : ‘देश हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, देश सर्वात मोठा आहे,’ असे मत कवी, गीतकार आणि भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी व्यक्त केले.‘सीएनएन-टीव्ही १८’चे कार्यकारी संपादक भूपेंद्र चौबे यांनी जोशी यांची मुलाखत घेतली. पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया आणि सागर चोरडिया या वेळी उपस्थित होते
‘मोदींच्या निवृत्तीनंतर मीही राजकारण सोडेन’ पुणे: ‘मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन, मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील, तेव्हा मीदेखील राजकारण सोडेन,’ असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले. ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language